महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.
वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.
पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे संकेतस्थळ :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नियम राजपत्र
छ.संभाजीनगर म.न.पा.कार्यालयीन आदेश
गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटर
म. प्रा. व न. र. अधि. 1966 मधील कलम 31 नुसार वगळलेल्या भागाची मंजूर विकास योजनेचे (E.P) प्रसिद्ध नकाशे
हर घर तिरंगा (स्वयंसेवक नोंदणी-प्रमाणपत्र-सेल्फी)
सेवानिवृत्त अधिकारी भरती
पथविक्रेते निवडणूक सूचना
रमाई आवास योजना
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गुणांकन
प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा सुधारित अंतिम दिनांक 03.12.2025
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 31(1) अन्वये मनपा सुधारित विकास योजनाचे भागशः मंजुर नकाशे दि.15.04.2025
एम.आर. आणि टी.पी. कायदा, १९६६ च्या कलम ३१(१) अंतर्गत प्रकाशित सीएसएमसीचा विकास आराखडा वगळलेला भाग
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा (District)
आम्हाला खेळु द्या
सप्ततारांकित नागरिक अँप्लिकेशन